Pankaja Munde
Pankaja Munde 
बातम्या

पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार? आज 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेंचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपनेत्या पंकजा मुंडे या सध्या पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. आजगोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात त्या काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान भाजपचे बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर आज होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटूंब जाणाऱ असल्याची माहिती आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आमदार आदित्य आणि तेजस ठाकरे असणार आहेत.

ठाकरे आणि मुंडे परिवाराचे ऋणानुबंध जगजाहीर आहेत. या परिवारातील स्नेहाचा ओलावा गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही कायम आहे. या स्नेहाच्या संबधांमुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब गोपीनाथ गडावर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती `सकाळला मिळाली आहे.

दरम्यान खासदार प्रितम मुंडे यांनी बुधवारी (ता.10)  गोपीनाथ गडावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये "उद्या तुम्हीच पहा काय होईल ते" असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.


Web Title: Pankaja Munde Many Be Quit BJP And She Will Join Shivsena

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

Today's Marathi News Live : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

SCROLL FOR NEXT